Breaking News

उलवे नोड येथे आध्यात्मिक सत्संग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

संत निरंकारी मंडळ उलवे नोड यांच्या वतीने रविवारी (दि. 29) भव्य निरंकारी आध्यात्मिक संत्संगचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्संग ज्ञानप्रचारक क्षत्रीय संचालक क्षेत्र क्रमांक 1चे ललित दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले असून या संत्संगाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

उलवे नोड सेक्टर 8 येथील डेल्टा टॉवर जवळ आयोजित केलेल्या या सत्संगावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप नेते किशोर पाटील, मनोज पवार, अशोक वाघमारे यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply