धाटाव विभागीय कबड्डी लीगमध्ये अनंता इंटरप्रायझेस संघ विजेता

धाटाव : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील धाटाव विभागाच्या वतीने प्रथमच विभागीय कबड्डी लीग नुकतीच बोरघर येथे आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेत अनंता इंटरप्रायझेस संघाने सोनेश्वर निवी या संघावर सहज विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. स्पर्धा साखळी पद्धतीत खेळविण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अनंता इंटरप्रायझेसच्या खेळाडूंनी चकमदार करामगिरी करीत आपली छाप उमटवली. तृतीय क्रमांक श्रेया स्पोर्ट्स वरसे, चतुर्थ क्रमांक गावदेवी रोठ बुद्रुक संघाने मिळविले. मालिकावीर म्हणून अनंता इंटरप्रायझेस संघाचा अष्टपैलू खेळाडू राकेश गायकवाड यास स्पोर्ट्स सायकल देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पकडपटू सोनेश्वर निवी संघाच दीपक भोकटे व उत्कृष्ट पकडपटू श्रेया स्पोर्ट्स संघाचा महेश जोगडे ठरले. त्यांना सोन्याची अंगठी देण्यात आली. पब्लिक हीरो गावदेवी रोठ संघाचा अशिष मोरेला स्पोर्ट्स सायकल तसेच उजवा कोपरारक्षक गावदेवी रोठ बुद्रुक संघाचा हर्षद बर्डे, डावा कोपरारक्षक सोनेश्वर निवी संघाचा विशाल माने, उजवा मध्यरक्षक अनंता इंटरप्रायझेस संघाच राज रटाटे, डावा मध्यरक्षक श्रेया स्पोर्ट्स वरसे संघाचा विराज पाटील, उत्कृष्ट बोनसपटू अनंता इंटरप्रायझेस संघाचा ओंकार भगत या सर्व खेळाडूंना कुलर देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेस धाटाव पंचक्रोशीतील पंच लाभले, तर म्हणून समालोचक  प्रशांत बर्डे, रूपेश रटाटे, अलंकार मनवी यांनी भूमिका निभावली. योगेश भगत, मयुर मोंढे, परेश मगर, दिनेश काबंळे, दिनेश भगत, मंगेश देवकर, संजय दलवी, विजय माने, आतेश पडवल, अरुण साळुंखे, गजानन भोकटे, संदेश रटाटे यांनी  स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केले होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply