उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील 13 शाळांचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून 93. 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. उरण तालुक्यात एकूण 13 शाळा आहेत. या 13 शाळांमधून विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील एकूण एक हजार 968 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एक हजार 827 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल 93.02 टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालात एनआय हायस्कूल 56.52 टक्के, उरण एज्युकेशन सोसायटी विज्ञान आणि वाणिज्य शाखा 100 टक्के, तुकाराम हरी वाजेकर विज्ञान 100 टक्के, वाणिज्य- 99.41 टक्के, कला 76.41 टक्के, छत्रपती शिवाजी हायस्कुल जासई, विज्ञान आणि कला दोन्ही शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकण एज्युकेशन चिरनेर-कला शाखा- 85 टक्के, कर्मवीर भाऊराव पाटील, पिरकोन, कला आणि वाणिज्य -100 टक्के, सिटीझन हायस्कूल, उरण विज्ञान आणि वाणिज्य – 100 टक्के, सेंट मेरीज स्कूल उरण, विज्ञान आणि वाणिज्य 100 टक्के, रामचंद्र म्हात्रे विद्यालय, आवरे विज्ञान- 78.20 कला- 67.64, वाणिज्य-100 टक्के, आर. एन. ठाकूर दिघोडे, कला- 100 टक्के, रोटरी स्कुल उरण, वाणिज्य- 100 टक्के, वीर सावरकर नवीन शेवे, विज्ञान- 100 टक्के, कला- 99:32 टक्के, पी. सी. पाटील चाणजे, वाणिज्य – 100 टक्के लागला असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper