पेण : प्रतिनिधी
पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत
पेणमधील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेत रवींद्र म्हात्रे, विनायक पाटील तसेच प्रथमेश मोकल यांच्याकडे किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी 45 सुवर्ण, 43 रौप्य आणि 18 कांस्यपदके जिंकून प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविण्याचा मान मिळविला.
स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जवळपास 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन निलेश भोसले यांनी केले होते. रायगड जिल्ह्यातून प्रशांत घांगुर्डे, चिंतामणी मोकल, सागर कोळी, प्रतिक कारंडे, संजय पाटील, शैलेश खोब्रागडे, संजय गमरे, स्वप्नील वारंगे या सर्व प्रशिक्षकांनी आपापल्या तालुक्यातून खेळाडूंना खेळण्यासाठी आणले होते.
सर्व विजयी खेळाडूंची आळंदी येथे होणार्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंना महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष मंदार पनवेलकर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Check Also
उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …
RamPrahar – The Panvel Daily Paper