Breaking News

शिवाजीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिवाजीनगर श्री. स. स. बाळकृष्ण महाराज माऊली मंदिरात गुरुपोर्णिमेनिमित्त व स्वानंद सुखनिवासी चांगू काना ठाकूर यांच्या तारखेनुसार पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी (दि. 13) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शकुंतला रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवाजीनर माऊली मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत भजन, 10 ते 11 प्रवचन, 11 ते 12 गुरुमाऊलींची पूजा-अर्चा आणि दुपारी 12 वाजता श्री गुरुमाऊलींवर पुष्पवृष्टी झाली. आरतीनंतर महाप्रसाद  झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन देवसाधक समाज न्हावे-न्हावेखाडी, गव्हाण-कोपर शिवाजीनगर यांनी केले असून व्यवस्थापन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांनी केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply