Breaking News

मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार -आमदार प्रशांत ठाकूर

भाजप उत्तर रायगड अल्पसंख्याक मोर्चा बैठकीत ग्वाही

पनवेल ः वार्ताहर

भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी बैठक गुरुवारी (दि. 28) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी येणार्‍या काळात मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार असल्याची ग्वाही देत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी साजरा करून 13 ते 15 ऑगस्टदरम्यान सर्वांनी घरावर झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगड अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. या बैठकीला भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जासिम गॅस, पनवेल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी, पमपा माजी नगरसेवक मुकीत काझी, पापा पटेल, तळोजाचे माजी सरपंच मुनाफ पटेल, जॅन शेख, समीना साठी, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅडव्होकेट इर्शाद शेख, जवाद काझी, निसार सय्यद, माजी नगरसेवक मेराज शेख, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हाणाले की, हा देश आपल्या सर्वांचा आहे. या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. सर्व धर्मांचा आदर राखला गेला पाहिजे, विशेष करून जो मुस्लिम समाज अनेक वर्षांपासून देशात राहत आहे, त्या समाजाविरोधात कोणी वक्तव्य केले असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये पक्षात कोणतेही दुमत नाही, तसेच देशाच्या स्वतंत्र्याचा अमृत महोत्वाव आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्रत्येक घरात झेंडा फडकवला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले, तर माजी नगरसेवक मुकीत काझी यांनी मुस्लीम समाज हा भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. इर्शाद शेख यांनी उत्तर रायगड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या संरक्षण भिंती व त्यांच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply