Breaking News

पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बुधवारी (दि. 17) झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या.

या बैठकीत आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधणे, महाराणी अहिल्याबाई होळकर भवन, पंतप्रधान आवास योजना, रोज बाजार निविदा, सिडको कडील भूखंड हस्तांतरीत करणे, मालमत्ता करांची बिले पाठविणे, वाहन खरेदी करणे, चौकांचे सुशोभिकरण करणे अशा विविध विकास कामांचा या वेळी आयुक्तांनी आढावा घेतला. तसेच त्या त्या विभागास कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या.

या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके , सचिन पवार,  गणेश शेटे, कैलास गावडे, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply