Breaking News

तिहेरी अपघातात मुंबईतील सहा जणांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका बाइकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणार्‍या भरधाव कारसमोर बाइकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. आकाश चव्हाण (42-बोरिवली), नवनाथ नवले (25- मोखाडा), भागवत जाधव (50 -पनवेल), प्रतिमा शहा (70 -कांदिवली), राकेश शहा (50 -कांदिवली) आणि दिलीप चंदानी (30 -पनवेल) हे सहा जण मृत, तर दोन जण जखमी झाले आहेत.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply