पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने खारघर येथील विश्वज्योत हायस्कूल या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
आदित्य राजेश मुंडे याने प्रथम, दीक्षा अंकुश वलवे द्वितीय आणि श्रुती संजय बोने हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या तिन्ही स्पर्धकांची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, स्वाती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper