पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा रविवारी (दि.7) एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उरणमधील जेएनपीटी मल्टिपर्पज हॅाल येथे होणार आहे. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला …
RamPrahar – The Panvel Daily Paper