रसायनी : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच नाजनिन खलील पटेल यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सरपंच नाजनिन पटेल यांच्या विरोधात 10 मते, तर बाजूने केवळ तीन मते पडली.
गेली अनेक वर्षे आपटा ग्रामपंचायतीवर शेकाप व अलिकडे काही वर्षे ठाकरे गट पर्यायाने महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे, पण आता ही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झाली आहे.
सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानावेळी अप्पर तहसीलदार इंगळे, मंडल अधिकारी कारेगावकर, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर तसेच रसायनी पोलीस अधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप नेते, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत, प्रवीण काळबागे, भाजप केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, राजू पाटील, विद्याधर जोशी, दत्ता पाटील, अॅड. निलेश हातमोडे, अॅड. आकाश, ज्ञानेश्वर भोईर, दर्शन भोईर, लक्ष्मण बावधने, राजा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
या वेळी भाजप नेतेे ज्ञानेश्वर घरत यांनी, आपटा येथे आता आमदार बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू झाली असून या परिसरात भाजपचे काम वेगाने वाढत आहे, असे सांगितले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रेनकोट, शिक्षकांना छत्री वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …
RamPrahar – The Panvel Daily Paper