उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या तक्रारीनंतर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील केगाव, चाणजे व बांधपाडा या तीन ग्रामपंचायतींमध्ये 22 जानेवारी 2019 ते 26 एप्रिल 2023 यादरम्यान वैभव पाटील ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
या तीनही ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असताना वैभव पाटील यांनी बनावट कागदपत्रे, बिले, निधीचा विनियोग, नियमबाह्य खर्च, ग्रामपंचायतीची जमा झालेल्या रक्कम बँकेत भरणा न करणे, कामात मनमानी, हलगर्जीपणा करणे आदी गैरप्रकार केले असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केलेल्या होत्या. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही अनेक तक्रारदारांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली होती.
ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन गटविकास अधिकार्‍यांनी वैभव पाटील यांची चौकशी सुरू केली होती. या खातेनिहाय चौकशीत तीनही ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले आहे. त्याची दखल घेऊन उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल यांनी दिली आहे.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply