Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये महत्त्वपूर्ण कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी (दि. 30) ‘इंटरडीसीप्लिनरी स्टेम अलाईन्ड विथ एनसीएफ’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे रायगड विभागीय समन्वय समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, विभागीय अधिकारी मोहन कोंगरे, सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जोत्स्ना ठाकूर उपस्थित होते.
या कार्यशाळेस प्रमुख वक्ता डॉ. नरेंद्र देशमुख (निवृत्त शास्त्रज्ञ, टाटा मूलभूत संशोधन संस्था) आणि प्रा. कैथरिन सी. साल्डुटी, (अध्यक्ष व संस्थापक, एज्युचेंज आयएनसी, यूएसए) यांनी विषेश मार्गदर्शन केले. त्यांनी प्रामुख्याने जागतिक स्तरावरील स्टेम शिक्षणाबद्दल राबविलेले उपक्रम व त्यांची अंमलबाजावणी योग्य पद्धतीने शाळेत करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांसमोर सोप्या व साध्या स्वरूपात मांडला.
कार्यशाळेत नवीन शैक्षणिक दृष्टिकोन, आंतरशाखीय शिकवणीचे महत्त्व तसेच जागतिक स्तरावरील स्टेम शिक्षणातील घडामोडी यावर सखोल चर्चा झाली. या उपक्रमामुळे शिक्षकांच्या बौद्धिक समृद्धीला नवीन दिशा लाभली असून कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थीेंद्रित अध्यापनाच्या उन्नतीस निश्चितच होणार आहे. ही कार्यशाळा एक संस्मरणीय व प्रेरणादायी अनुभव ठरली.
प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली व को-ऑर्डिनेटर रुहाल दुबे, कोमल गायकवाड, लुब्ना तांबोळी तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यशाळा यशस्वी झाली.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply