पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत पनवेल तालुक्यातील शेडुंग येथे नवीन अंगणवाडी इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे 11 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या अंगणवाडीचे उद्घाटन गुरुवारी (दि. 5) भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने, अशोक गायकर, उपसरपंच सुनील पाटील, सुभाष पाटील, रामदास वाघमारे, रामदास खेत्री, निलेश पवार, विठ्ठल दुर्गे, प्रकाश खेत्री, गजानन दुर्गे, कल्पेश गोजे, प्रतीक खेत्री, चेतन गायकर, अविनाश खेत्री, विनोद खेत्री, शिवाजी दुर्गे, रूपेश दुर्गे, अरविंद पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये सातत्याने विकासकामे केली जात आहेत. त्यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नांमुळेच शेडुंग येथील ही अंगणवाडी साकार झाली आहे.
Check Also
भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक …
RamPrahar – The Panvel Daily Paper