भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
हर घर तिरंगा अभियान केवळ उपक्रम नसून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे. या अभियानाच्या प्रभावी आणि यशस्वी नियोजनासाठी भारतीय जनता पक्ष कोकण व ठाणे विभागाची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.3) पनवेल येथे पार पडली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या नियोजन बैठकीला अभियान संयोजक तथा प्रदेश महामंत्री योगेश सागर, सहसंयोजक तथा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नगरसेवक सुमित झुंजारराव, विकास घरत, दिनेश खानावकर, पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ यांच्यासह कोकण व ठाणे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचावा आणि प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकावा या उद्देशाने या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper