Breaking News

महाडमध्ये अभियांत्रिकी संघटनेचा कौटुंबिक मेळावा

महाड : महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीने नुकताच महाडमध्ये कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात कोकणासह 36 जिल्ह्यातील पदाधिकारी सपत्नीक सहभागी झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील बालाजी रिसॉर्टमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये विरकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला. दुसर्‍या दिवशी जंजिरा किल्ला, काशिदचा किनारा आदी परिसरांचा फेरफटका मारण्यात आला. त्यानंतर शिवथरघळ, महाड शहरातील क्रांतिस्तंभ, चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या स्थळांना भेटी दिल्या. या वेळी प्रतिमा गुल्हाने यांनी मार्गदर्शन केले. अखेरच्या दिवशी सायंकाळी सांगता समारंभात राज्याच्या मध्यवर्ती कार्यकारीणीचे सरचिटणीस भुजबळ यांनी आभार मानले.

दहिवली ग्रामपंचायतीतर्फे 14 दिव्यांगांना धनादेश

कर्जत : तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायतीमधील पाच गावे आणि एका आदिवासीवाडीतील 14 दिव्यांगांना सरपंच चिंधु तरे यांच्या  हस्ते एकूण 12 हजार 861 रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. विशाल रमेश मते, लक्ष्मण बारणेकर, श्रीपत शेकटे, एकनाथ माळी, काशिनाथ विरले, यशवंत शेंडे, राजेंद्र मेंगाळ, रघुनाथ तरे, जनार्दन तरे, माया कामतीकर, राहुल भोईर, रोहिदास जाधव आणि जगन्नाथ डोळेमिटे आदी दिव्यांगांचा त्यात समावेश आहे. उपसरपंच यशवंत बळीराम भवारे, ग्रामपंचायत सदस्य किसन लहू जामघरे, महेश सुदाम मोरगे, राजेंद्र सदानंद भोईर, कैलास तुकाराम विरले, निकिता रघुनाथ भोईर, मेघा दिनेश कालेकर, अश्विन वसंत घहाड, हर्षदा रमेश कुंभार, अंकिता अरुण विरले, सविता जनार्दन निरगुडा यांच्यासह ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

कार पलटी होऊन अपघात

पाली : खोपोली-पाली मार्गावरील दूधानेची वाडी येथे शुक्रवारी (दि. 15) क्रेटा कार पलटी झाली. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले. खोपोली-पाली-वाकण या रस्त्याच्या रुंदिकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दूधानेची वाडी गावाच्या तलावासमोर एका मोरीचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास क्रेटा कार (एमएच-02, एफई-2106) या रस्त्यावरुन पालीकडून खोपोलीकडे जात होती. दूधानेची वाडी गावाच्या परिसरात समोरुन येणार्‍या वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे चालकाला रस्त्यांचा अंदाज न आल्याने क्रेटा कार काम चालू असलेल्या मोरीत पलटी झाली.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply