Breaking News

पनवेल महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या वतीनं राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 16) करण्यात आले. ही मोहीम पोलिओविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि अपेक्षित लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी राबविण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेलमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 मध्ये राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 0 ते 5 वयोगटातील बालकांना डोस देण्यासंदर्भात, तसेच एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी ही मोहीम रावबविण्यात येते. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, नागरी आरोग्य केंद्र 1 डॉक्टर रेहाना मुजावर, महापालिका आरोग्य सेवक आणि पोलिओ पर्यवेक्षक अलंकार थवई याच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply