Breaking News

कै. चांगू काना ठाकूर पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी-शिक्षकांचा होणार गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा व त्यांना अध्यापन करणार्‍या गुणवंत शिक्षकांचा गौरव जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईचे विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, वाशी विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे, राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे; तर विशेष अतिथी म्हणून सिडको अध्यक्ष तथा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, नगरसेवक प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव व सहकार्‍यांनी केले आहे.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply