मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करून विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी (दि. 23) देण्यात आली. फोन करणार्या व्यक्तीने सांगितले की, ‘एक विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल.’ दरम्यान, या घटनेनंतर देशातील सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांची सुरक्षा व्यवस्था आधीच वाढविण्यात आली होती. एअर इंडियाच्या सेंटरमध्ये आलेल्या धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper