Breaking News

निघालो घेऊन पालखी विठ्ठलाची..! ; आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर झाले पालखीचे भोई

पनवेल : रामप्रहर वृत्त

विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी

(दि. 12) वारकरी दिंडी काढली. निमित्त होते आषाढी एकादशीचे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतात. हा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी ठिकठिकाणच्या शाळांमध्येही शुक्रवारी दिंडी काढण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिणीसह संतांच्या वेशभूषा केल्याचे पाहावयास मिळाले. दिंडीत शिक्षकही होते.पनवेल महानगरपालिकेच्या पोदी येथील शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सहभाग घेत पालखीचे भोई होण्याचा मान मिळविला. या वेळी नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

‌‘जनसेवेचे अमृतपर्व‌’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन

मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply