Breaking News

नेरळमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आज गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नेरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दर्शन सालेकर  यांच्यासह स्टेशन आळी परिसरातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन, तीन आणि पाचमधील हे सर्व कार्यकर्ते असून त्यांनी नेरळ शिवसेना शाखा कार्यालयात शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे  विधानसभा मतदारसंघाचे संघटक संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशासाठी पुढाकार घेणारे नेरळ   शहरप्रमुख रोहिदास मोरे यांनी प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांची ताकद तीन प्रभागांत असल्याची माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सावळाराम जाधव, तालुका उपप्रमुख अंकुश दाभणे, सरपंच जान्हवी साळुंखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …

Leave a Reply