मुरुड : प्रतिनिधी
72 वा भारतीय स्वातंत्र्य दिन आज विविध कार्यक्रमानी आज तालुक्यात सर्व ग्रामपंचायत, शहरात मध्येही सकाळी 7-30वाजता ध्वजारोहण कार्यक्रम ठिक ठिकाणी संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी मुरुड नगर परिषदेच्या प्रांगणात उपनगराध्यक्ष नौसिन दरोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, गटनेत्या मुग्धा जोशी, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर, मुख्याधिकारी अमित पंडीत यांच्यासह नगरसेवक व कर्मचार्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.आझाद चौकातील ध्वजारोहण मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुरुड तहसिल कार्यालापर्यत प्रभात फेरी काढण्यात आली. तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच समाजसेवक जाहीद फकजी, डॉ. राज कल्याणी, तहसील कार्यालयातील शिपाई प्रेमनाथ पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच उदय खोत, निलोफर हमडुले, अमृत आरेकर, प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, अनुज भोईर, प्राची अदावडे, आशिया कबले, शेतकरी भिकू गायकर, पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार परिक्षित पाटील यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper