पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयाजित ‘सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉलमध्ये गुरुवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात अभंग वाणी, महिलांसाठी खेळ पैठणीचा व सिनेकलाकारांसोबत दिलखुलास गप्पांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, दर्शना भोईर, कुसुम पाटील, हेमलता म्हात्रे, खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजश्री पवार, तालुका सरचिटणीस लीना पाटील, श्वेता खैरे, तालुका उपाध्यक्ष समिना साठी, प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, भाजप नेते भीमराव पवार यांच्यासह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमास सुप्रसिद्ध कलाकार ओमप्रकाश शिंदे, पल्लवी शेट्टी, मयुरेश जोशी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून रसिकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. अभंग वाणी या कार्यक्रमात नव्या रुपातील अभंगांचा सर्वांनी आस्वाद घेतला. तसेच महिलांनी पैठणीच्या खेळात सहभाग घेतला.
RamPrahar – The Panvel Daily Paper