सिन्नर : रामप्रहर वृत्त
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्रीसंत हरिबाबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले.
‘रयत’चे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुजाता पोखरकर, विभागीय अधिकारी संजय नागपुरे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अॅड. विलास पगार, मुख्याध्यापक दत्तात्रय गोसावी यांच्यासह पांगरी पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, स्कूल व सल्लागार कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, शिक्षक, सेवकवृंद, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.