Breaking News

प्रभाकर मोरेंना अखेरचा निरोप

महाड : प्रतिनिधी

माजी ग्रामविकास तथा गृहराज्यमंत्री प्रभाकर (भाऊ) मोरे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 15) महाडच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी

स्व. मोरे यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

महाड विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी शनिवारी सकाळी 10:30 वाजता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.(सविस्तर वृत्त पान 5 वर..)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply