Breaking News

धरणाच्या वाडीतील महिला कार्यकर्त्या भाजपत दाखल, तालुकाध्यक्ष ढवळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

माणगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माणगाव तालुक्यातील धरणाची वाडीमधील महिला मंडळाने बुधवारी (दि. 18) सायंकाळी

भाजपत प्रवेश केला. माणगाव येथील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

धरणाच्या वाडी येथील राखी राणे, शिल्पा राणे, सलोनी चव्हाण, मनाली जाधव, चंद्रा पवार, गीता रसाळ, ज्योती रसाळ, सुरेखा पडगुळेकर, सुरेखा जाधव यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

देश व राज्यातील भाजप सरकार जनतेच्या हिताची धोरणे राबवत आहेत. परिणामी विकासगंगा घराघरात पोचली आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील अनेक गावांतील तरुण कायकर्ते, महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने भाजपत येत आहेत, असे संजयअप्पा ढवळे यांनी सांगितले. या वेळी भाजप तालुका सरचिटणीस योगेश सुळे, महिला मोर्चा अध्यक्षा यशोधरा गोडबोले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राकेश पवार, संतोष कदम, बाबूराव चव्हाण आदी पदाधिकार्‍यांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply