मोहोपाडा ः राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, तसेच परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता यासंदर्भात मुलांना माहिती देण्यात आली. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अस्वले, सुवर्णा जाधव, नरेंद्र विश्वकर्मा, सुनीता मंडराई, अनिता बिंदू, मुख्याध्यापिका राखी खराडे, महेंद्र जाधव, स्नेहल कान्हेर, मीनाक्षी फड, वंदना जाधव, रूपाली पाटील, हरी कोंडीलकर, जानकी येवले आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper