Breaking News

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज कळंबोलीत सभा

कळंबोली : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा रविवारी (दि. 13) कळंबोली सेक्टर 8 येथे हिंदुस्थान बँकेच्या बाजूला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या सभेला माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply