Breaking News

पनवेलमध्ये महायुतीची एक्स्प्रेस सुसाऽऽट…, सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास!

पनवेल : सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास या धोरणानुसार लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि उत्तुंग विकासकामांद्वारे पनवेलचा चेहरामोहरा बदलणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचाराची एक्स्प्रेस सुऽऽसाट असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी रविवारी (दि. 13) पाली देवद, देवद, विचुंबे, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई आदी ठिकाणी प्रचार करण्यात आला. या प्रचार दौर्‍याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांचे जागोजागी औक्षण आणि स्वागत करण्यात आले, तर विकासमूर्ती आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता.या प्रचार दौर्‍यात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, उपसरपंच दत्ताशेठ भगत, अनेश ढवळे, युवा नेते प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, अशोक पाटील, राजेश पाटील, पांडुरंग केणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply