Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज खारघरमध्ये सभा

पनवेल : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता खारघर येथे होणार आहे.

या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, राज्यमंत्री व डोंबिवलीचे उमेदवार रवींद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रविशेठ पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ही सभा खारघर सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्कजवळील भव्य मैदानावर होणार आहे. या सभेची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply