Breaking News

शेकापला लागलेली गळती काही थांबेना!, कामोठ्यातील सक्रिय कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षाने केलेली विकासकामे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाकडे आकर्षित होऊन कामोठे येथील साईकिरण सोसायटीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सर्वांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले.शेकापचे कुचकामी धोरण आणि दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून कामोठे येथील साईकिरण सोसायटीतील शेकापचे राजेंद्र सुर्वे, बाबासाहेब ठोबळे, जी. के. गायकवाड, दादासाहेब घोरपडे, रामचंद्र कदम, कैलास पाटील, विजय वाकोडे, श्रीरंग बोडके, पुरुषोत्तम गुजरी, सचिन राठोड यांनी राजेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास युवा नेते सचिन गायकवाड व इतर उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply