Breaking News

मतदारांच्या तक्रारीसाठी ‘गार्हाणे’ मतदार यादी, केंद्राची मिळणार माहिती

पनवेल ः बातमीदार

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी गार्‍हाणे, नियंत्रण व मदत पथक कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून हजारो तक्रारी सोडविण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरील निवडणूक हेल्पलाईन कक्षातील कामकाज पाहणे, निवडणुकीसंदर्भात नागरिकांकडून येणार्‍या तक्रारींचे निवारण करणे, इतर आनुषंगिक कामे करणे या कक्षाचे काम आहे. या पथकाचे प्रमुख संदीप रोडे असून विजय मोरे, महेश गायकवाड, वसंत उगले, गणेश कांबळे, तायप्पा पांढरे हे मदत करत आहेत. तहसील कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी गार्‍हाणे, नियंत्रण व मदत पथक, जनसंपर्क व संदेश वहन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांसाठी 022-27450153 हा क्रमांक 24 तास उपलब्ध असणार आहे. लोकसभेपासून ते 17 ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीपर्यंत दोन हजार 944 तक्रारी या कक्षात प्राप्त झालेल्या असून, दोन हजार 909 तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती रोडे यांनी दिली आहे. तक्रारीमध्ये ओळखपत्र आलेले नाही, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदार यादीत नाव नाही, मतदान केंद्र कुठे आहे, याचा जास्तीत जास्त समावेश होतो. तहसील कार्यालयातील आलेल्या नागरिकांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे का, मतदान केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, यादी क्रमांक व अनुक्रमांक किती आहे, याची माहिती दिली जाते व त्याच्या तक्रारीचे निवारण केले जाते. हा कक्ष 24 तास कार्यान्वित आहे. मतदानविषयी माहिती हवी असेल व तक्रार करावयाची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply