Breaking News

गांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने ‘टोलवले’

रांची : वृत्तसंस्था

सौरव गांगुली अजून माझ्याशी धोनीबद्दल बोललेला नाही आणि तुम्हाला धोनीला भेटायचं असेल तर तो ड्रेसिंग रूममध्ये आहे, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गांगुली व धोनीबाबतचे पत्रकारांचे प्रश्न टोलवून लावले.’सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले ही आनंदाची बाब आहे. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र त्यांनी धोनीबद्दल माझ्याशी अद्याप कुठलीही चर्चा केलेली नाही. त्यांना बोलायचे असेल तेव्हा नक्की बोलतील, असे एका प्रश्नावर विराट म्हणाला, तर धोनीच्या भेटीबद्दलही विराटने धोनी आताही चेंजिंग रूममध्ये आहे. इच्छा असल्यास तुम्हीही त्याला ’हॅलो’ करू शकता, असे म्हणाला.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply