Breaking News

पनवेल शहर पोलिसांनी राबवली दंगा काबू योजना

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत हिंदू-मुस्लीम संमिश्र लोकवस्ती असलेल्या टपाल नाका परिसरात आज सकाळी दंगा काबू योजना राबविण्यात आली.

संमिश्र लोकवस्तीत टपाल नाका-मिरची गल्ली-मुसलमान नाका-पटेल मोहल्ला-कोळीवाडा-उरण नाका-शिवाजी चौक असा रूट मार्च केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना डिब्रिफिंग केले. दंगा काबू योजना रंगीत तालीममध्ये एसआरपीएफ, आरसीपी, झोन-2 स्ट्रायकिंग, बिटा-3, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याकडील एकूण 02 पोलीस निरीक्षक, 05 पोलीस अधिकारी, 89 कर्मचारी सहभागी झाले होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply