Breaking News

जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल ः घोट (ता. पनवेल) हायकल लिमिटेडमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. नामफलक अनावरण सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जय भारतीय कामगर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवींद्र नाईक, पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, रवींद्र कोरडे, भाजप प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष कृष्णा पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण दिवाळी अंकाचे प्रकाशन

खारघर ः पत्रकार संजय महाडिक यांच्या ‘कोकण दर्पण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक निलेश बावीस्कर, नगरसेविका संजना कदम, महिला उपाध्यक्ष योगीता कडू, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन बुधोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विठ्ठल-रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

खारघर ः बेलपाडा येथे कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट देत विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळसी विवाह कार्यक्रम

खारघर ः खारघर स्पॅगेटी येथील मैदानात संत माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित सप्ताहात तुळसी विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक निलेश बावीस्कर, नगरसेविका संजना कदम, महिला उपाध्यक्ष योगीता कडू, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन बुधोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आयोध्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा दिवे लावून आनंद साजरा करण्यात आला.

नितळस ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास मढवी यांचा वाढदिवस

पनवेल ः नितळस ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply