Breaking News

देव होण्याचा प्रयत्न करा -इंदुरीकर महाराज

कर्जत : प्रतिनिधी

जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान, आई-बापाची सेवा जो करतो त्याने देवाला गेलेच पाहिजे असे नाही. स्वतःचा धर्म पाळणे हीच देवाची पूजा. देव पाहू नका देव होण्याचा प्रयत्न करा,   असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून येथे केले.

कर्जत तालुक्यातील हलीवली येथील भैरवनाथ मंदिरामधील काकड आरतीच्या सांगता सोहळ्यानिमित्त विजय हांडे आणि उपसरपंच सारिका हांडे यांनी ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी शिवभोळा चक्रवर्ती…या एकनाथ महाराजांच्या अभंगावर कीर्तन सादर केले.ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे आणि ह. भ. प. दत्तात्रेय श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ करण्यात आला. रायगड भूषण बडेकर यांचा इंदुरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply