Breaking News

मनसेचे एकमेव आमदार सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सहा नगरसेवकांपाठोपाठ राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.

मनसेचे जुन्नर येथील आमदार शरद सोनावणे यांनी मंगळवारी (दि. 5) मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला शरद सोनावणे यांनी वाचवलं होतं, मात्र आता सोनावणे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेत राज ठाकरेंची ती नौकाही बुडण्याच्या मार्गावर आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply