Breaking News

मोहोपाडा शिशु बालमंदिरात बालदिन साजरा

मोहोपाडा : वार्ताहरपंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळ संचलित शिशुविकास बालमंदिर येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी बालदिनानिमित्त शाळेमध्ये जाऊन मुलांशी खुल्या मनाने संवाद साधला. त्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे, स्वतःची काळजी घेणे, स्वच्छता इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. बालकामगारांना कामावर ठेवू नये, त्यांना शिक्षणापासून वंचित करू नये, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी शिशुविकास बालमंदिरच्या शिक्षिका, महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply