पनवेल ः महिंद्रा गाडीवरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने चालवून समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील वाजे गावाच्या हद्दीत घडली.जेम्स दुराई पांडियान (रा. कोप्रोली) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एमएच 46-बीए 2731 ही गाडी चालवित असताना समोरून आलेले हरिश्चंद्र सीताराम जळे यांच्या मोटरसायकलीस धडक दिली. या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात आणले असता, तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, उपनिरीक्षक कुदळे अधिक तपास करीत आहेत.
Check Also
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …
RamPrahar – The Panvel Daily Paper