Breaking News

साळाव येथे विवाहित महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी

साळाव येथे एका विवाहीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे.साळाव येथील प्राजक्ता कांबळे (वय 25) ही विवाहीत महिला मंगळवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास  ओसरीवर जाऊबाईसह गप्पागोष्टी करीत बसली होती. त्यावेळी   तेथील सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्‍या किशोर कांबळे यास प्राजक्ताने भाऊ तुम्ही आलात काय ? असे विचारणा केली. त्याचा राग मनात धरून किशोर कांबळे यांने प्राजक्ता हिला अश्लिल शिवीगाळ करून घराच्या पायरीवर ठेवलेल्या कौलावर तिचे डोके आपटले, अशी तक्रार प्राजक्ता कांबळे हिने रेवदंडा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार किशोर कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार महाले करीत आहेत.

Check Also

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या

प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …

Leave a Reply