Breaking News

विद्यार्थ्यांनी भरविले फळे व भाजीपाला प्रदर्शन

मोहोपाडा ः वार्ताहर

चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयात विविध उपक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक विभागात फळे व भाजीपाला प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे संचालक योगेश्वर स्वामीजी, आत्मस्वरूप स्वामीजी, मुख्याध्यापक जॉन्सन व इतर शिक्षकवृंद यांनी लहान विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या वेळी आहार व आजचे जीवन यावर मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या फास्ट फूड व धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्य गमावून बसलो आहोत. बदलती जीवनशैली व झपाट्याने वाढणार्‍या शहरीकरणामुळे बेकरी, पिझ्झा, बर्गर यांच्या आहारी आपण गेलो आहोत. यामुळेच फळे व भाजीपाला यांचे महत्त्व ओळखून त्यांचा आपल्या आहारात समावेश करण्याच्या हेतूने व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे

शिक्षकांनी सांगितले.

विद्यार्ध्यांनी विविध भाज्या व फळे यांचा वापर करून आकर्षक सजावट करून प्रदर्शन भरवले होते. या उपक्रमातून आपल्या आहारात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांचा समावेश असावा, असा संदेश देण्यात आला.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply