पनवेल ः वार्ताहर
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची सर्वानुमते निवड झाली आहे. मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक शुक्रवारी (दि. 13) येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या वेळी सन 2020करिता कार्यकारिणी बिनविरोध जाहीर
करण्यात आली.
नव्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी हरेश साठे, खजिनदारपदी विवेक पाटील, कार्याध्यक्षपदी अनिल भोळे, उपाध्यक्षपदी तृप्ती पालकर यांची निवड करण्यात आली असून, सदस्य म्हणून संजय कदम, मंदार दोंदे, अविनाश कोळी, प्रशांत शेडगे, नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर असणार आहेत.
या वेळी मावळते अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार मंचच्या माध्यमातून वर्षभरात केलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन सर्वांनी चांगले योगदान दिल्याचे नमूद केले, तर अध्यक्ष माधव पाटील यांनी पत्रकार विकास मंच गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून फक्त पत्रकारिता नाही, तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत असल्याचे सांगून यापुढेही विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper