Breaking News

रेवदंड्यात ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

रेवदंडा : प्रतिनिधी

येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासदांसाठी रेवदंड्यातील डॉ. विजय वरसोलक यांच्या रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्था व रेवदंडा-चौल डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात रक्तशर्करा तपासणी, युरिक अ‍ॅसिड व हिमोग्लोबीन तपासणी, डायबिटीस तपासणी व उपचार करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय वरसोलकर, संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस, अशोक देवधर, विलास घोसाळकर आदी पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला विविध औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply