Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त

अस्मिता क्रिडा, सांस्कृतिक मित्र मंडळ, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रिडा मित्र मंडळ व रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशन यांच्या वतीने 2020 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपीळे, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, पत्रकार मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज घोसाळकर, सरचिटणीस शैलेश गावंड, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पराडकर, जिल्हा सहकार्यध्याक्ष नारायण खुळ, विजय म्हात्रे, जनार्दन थळी, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, गौरी पवार, शोभा पन्हाळे आदी उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply