Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे काम अंतिम टप्प्यात

मान्यवरांकडून पाहणी

सातारा : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी या भवनाच्या कामाची बुधवारी (दि. 8)  पाहणी केली.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव भाऊसाहेब कराळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply