Breaking News

भाजपच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी नेरळचे मंगेश म्हसकर

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य मंगेश राजाभाऊ म्हसकर यांची भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगेश म्हसकर यांच्या निवडीने भाजप कर्जत तालुका मंडळाला तरुण अध्यक्ष मिळाला आहे.

भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक निवडणुक प्रक्रिया डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाली होती. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी  पंढरीनाथ राऊत, राजेश भगत आणि मंगेश म्हसकर यांनी इच्छुक म्हणून आपले नामांकन पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांकडे सादर केले होते. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून मंगेश म्हसकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. मंगेश म्हसकर यांच्या रूपाने भाजपला नवीन अध्यक्ष मिळाला असून ते नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply