Breaking News

कळंबोलीच्या सार्वजनिक हळदी-कुंकू, समारंभाला मान्यवरांची उपस्थिती

कळंबोली : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीने कळंबोली येथे सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 2) करण्यात आले होत. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मंदा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, सरचिटणीस मनिषा निकम, प्रियांका पवार, सुगंधा पाटील, जयश्री पाटील, पुष्पा बनकर, प्रेमा भोपी, मयुरी पेरवी, सोनम पाटील यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. समारंभामध्ये महिलांसाठी खास कार्यक्रम, लकी ड्रॉ बक्षिसे आदी आयोजित कार्यक्रमांचा महिलांनी लाभ घेतला.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply