Breaking News

धाटावमध्ये मराठी भाषा गौरव दिन

रोहे : प्रतिनिधी

एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या धाटाव येथील महिला महाविद्यालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी फाऊडेशनचे संचालक अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुखद राणे यांनी, कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेतून स्वतःचे करिअर घडविण्यासाठी उपलब्ध असणारी संधी, या विषयावर

मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. हणमंत ढवळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाविषयी माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील विद्या काटकर, मनाली खैर, दामिनी म्हसकर, श्रृती खराडे, इशा जोंधळे व धनश्री कोंडे या विद्यार्थीनींनी स्वरचीत कवितांचे गायन केले. सूत्रसंचालन श्रृती खराडे हिने केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रसन्न म्हसळकर, प्रा. माधुरी जाधव, दिपेश भोसले, जुबेदा खोत, प्रा. योगिता निहाते, प्रा. नरेश घाग, प्रा. हेमलता पाटील यांच्यासह विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. इशा जोंधळे हिने आभार मानले.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply