Breaking News

‘त्या’ नराधमावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील धोत्रे गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कृष्णा नामा आगीवले याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची  न्यायालयीन कोठडी

सुनावली आहे.

कर्जत तालुक्यातील धोत्रे गावातील 13 वर्षीय पीडित मुलीच्या घरात तिची आई आणि लहान बहिणीशिवाय कोणीही पुरुष मंडळी नाही, ही बाब ध्यानात घेऊन त्याच गावातील कृष्णा आगीवले याने तिच्याशी शारीरिक सबंध प्रस्थापित केले. नंतर पीडित मुलीची आई आणि बहीण यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा अतिप्रसंग केले.  पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीला माथेरान येथे नातेवाईकांकडे नेऊन ठेवले होते. मात्र कृष्णा  तेथेही जाऊ लागला होता. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने माथेरान पोलीस ठाण्यात तक्रार केली.या प्रकरणी कृष्णा आगीवलेवर भादवी 376(2)(फ) तसेच 323,504 आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,  त्याला अटक केली आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply