Breaking News

धोनीची बाइक राइड; सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड

चेन्नई : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी हा गेल्या बर्‍याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2020च्या निमित्ताने तो चाहत्यांच्या दृष्टीस पडणार होता, पण कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे आता त्या गोष्टीसाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. असे असले तरी रांचीत परतल्यानंतर धोनीने बाइक राइड मारून चाहत्यांना खूश केले. या वेळी ‘माही’सोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी त्याला गराडा घातल्याचे दिसून आले.आयपीएलच्या तयारीसाठी धोनी आणि इतर खेळाडू चेन्नईमध्ये दाखल झाले होते. तेथे सरावाला सुरुवातदेखील झाली होती, पण कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन लांबणीवर पडल्याने धोनी पुन्हा स्वगृही परतला. रांचीत परतल्यानंतर धोनी रांचीच्या रस्त्यांवर बाइक राइड करताना दिसला. हेल्मेट घालून त्याने रांचीच्या रस्त्यावर एक फेरफटका मारला. त्याच वेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला ओळखले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply